साहेबांनी आदेश दिल्यास विधानसभा लढवणार

0

मुंबई- वरळी विधानसभा लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवण्याची तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. साहेबांनी आदेश दिल्यास आपण या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहोत असे संदीप देशपांडे यांनी नवाकाळ शी बोलताना सांगितले.

आम्ही सर्वच विधानसभा जागांवर तयारी सुरु केलेली आहे, त्याप्रमाणे वरळी मध्येही तयारी सुरु आहे असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेच्या अरविंद सावंतांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅटट्रिक पूर्ण केली. या मतदारसंघात त्यांना मलबार हिल आणि कुलाबा वगळता उर्वरीत 4 विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली.

भायखळा मतदारसंघातून सावंतांना सर्वाधिक 46 हजार 016 मतांची आघाडी मिळाली. तर मुंबादेवी मतदारसंघातून 40 हजार 779 मतांची आघाडी होती. शिवडी विधानसभा मतदारसंघातून सावंतांनी 16 हजार 903 मतांची आघाडी घेतली. पण, ठाकरेंच्या शिवसेनेचे तब्बल 3 आमदार असलेल्या वरळी मतदारसंघात मात्र पक्षाला केवळ 6 हजार 715 मते अधिक घेता आली. मराठी मतदार बहुल असलेल्या वरळीतील याच पिछेहाटवरुन स्थानिक आमदार असलेले आदित्य ठाकरे विरोधकांच्या निशाण्यावर आलें आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech