शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला ईलेक्टोरोल बाँडचा पैसा – राहुल गांधी

0

ठाणे, १६ मार्च  : शिवसेना पक्ष फोडून जे आमदार बाहेर पडले ते काय असेच मोफत गेले का? महाराष्ट्र, गोवा राज्यांतील सरकारे पाडण्यात याच इलोक्टोरल बाँडमधून कमावलेल्या खंडणीच्या पैशाचा वापर केला गेला, असा आरोप कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ठाण्यात सभेत बोलताना खासदार राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.

ते पुढे म्हणाले की, इलोक्टोरल बाँड हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मोठो खंडणी वसुली रॅकेट आहे. या रॅकेटमधून कार्पोरेट कंपन्यांवर दबाव टाकून पैसे उकळले जातात. याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास अमित शाह ईडी, सीबीआय, आयकर विभागाकडून त्यांचा आवाज दडपून टाकतात.

एकीकडे नरेंद्र मोदी भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करतात आणि तेच मोदी इलोक्टोरल बाँडच्या माध्यामातून जगातील सर्वात मोठे खंडणी वसुली रॅकटे चालवतात. कोविडमध्ये लाखो लोकांचा मृत्यू होत होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला टाळ्या, थाळ्या वाजवण्यास सांगत होते आणि दुसरीकडे कोविडची लस बनवणारी सिरम कंपनी कोट्यवधी रुपये इलोक्टोरल बाँडमधून मोदींना देत होती, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

देशात ओबीसी, दलित, मागास, आदिवासी समाजाची ८८ टक्के लोकसंख्या आहे, पण प्रशासनासह महत्वाच्या क्षेत्रात त्यांची भागिदारी अत्यंत कमी आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech