विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार- पूर्वेश सरनाईक
शालेय नवीन वर्षाची सुरूवात विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा दिवस असतो. पण आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी खारखर आळी येथील ठाणे पोलीस शाळेत जवळपास ११२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला.
निराश पालकांनी संपर्क केला असता त्यांना आणि त्यांच्या मुलांना झालेल्या वेदना ऐकून घेताना खूप वाईट वाटलं.
ॲडव्हान्स फी भरण्याची शेवटची तारीख १२ जून आहे तरी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यांना सकाळी ७.३० वाजल्या पासून शाळे बाहेर थांबविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर या घटनेचा काय प्रभाव पडेल ह्याचा जरा देखील विचार केला नाही.
पोलीस शाळेला भेट देऊन विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेतल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत त्यांना देखील भेटलो.
लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यात येतील. त्यांच्या सम्यास्यांचे पूर्णपणे निराकरण करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करत आहे असा पालकांना विश्वास दिला. पुर्ण कार्यवाही होत नाही तोपर्यंत मी ह्या घटनेचा पाठपुरावा करत राहणार.
शिक्षण मंत्र्यांना मी याबाबत पत्र पाठवतो आहे. विद्यार्थ्यांना शाळेत आनंदात जाताना पाहण्यासाठी मी माझे पूर्ण प्रयत्न करतोय. असं ह्यावेळी बोलताना पूर्वेश सरनाईक यांनी मत व्यक्त केलं.
यावेळी युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितिन लांडगे, ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम, युवासेना ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख निखिल बुडजूडे, नितेश पाटोळे, युवासेना विधानसभा उपाध्यक्ष निखिल वाडेकर, सुशांत मयेकर,अशफाक शेख, ओम पवार, अखिल माळवी, साई ढवळे, अमित यादव, विराज कोकाटे, प्रसाद वाघ, संदीप तिवारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.