ज्येष्ठ नागरिक गटातून ॲड. मोहन निंबाळकर प्रथम
ठाणे : कोण होणार येऊरचा सायकल राजा आणि राणी या स्पर्धेबद्दल सायकलप्रेमींमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लूप अशी स्पर्धेची संकल्पना होती. अखेर रविवारी भर पावसात ही स्पर्धा संपन्न झाली.
येऊरचा सायकल राजा (खुला गट) शिवम खरात, ज्येष्ठ नागरिक गटातून ६३ वर्षीय ॲड. मोहन निंबाळकर तर येऊरची सायकल क्वीन ठरली निकिता मधार. तसेच, खुल्या गटातून हवाई दलातील रजत मैन यांना रौप्य पदक तर नौदल सेवेतील रिंकू सिंग यांना कांस्य पदक तसेच, महिला गटातून ममता परदेशी यांना रौप्य तर कॅन्सरवर मात केलेल्या नेहा राजुरीकर यांना कांस्य पदकांनी गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सायकलपटू प्रा. नारायण बारसे, प्रा. सुनील भुसारा आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सायकलप्रेमींना मार्गदर्शन करताना प्रा. बारसे म्हणाले की, सायकलिंग येऊरला नियमीत केली तर फुप्फुसाची क्षमता खूप वाढते. मी मागच्या नोव्हेंबर महिन्यात ३०० लूप्स येऊरला केले होते. त्यामुळे मला येऊरचा फायदा माहित आहे. येऊरला साधारणपणे फारसे सायकलप्रेमी येत नाही. येऊरला सायकलिंग केले तर स्नायू बळकट होतात. या स्पर्धेमुळे नवीन सायकलप्रेमींनी येऊरला आले. सायकल सर्वांनी नियमीतपणे चालवायला हवी, फिट राहायला हवे..
सायकल ही नेहमी आपल्याला ऊर्जा देते. अशा भावना प्रा. बारसे यांनी व्यक्त केल्या. सुरूवातीला प्रास्ताविकात संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी सांगितले की खरं तर येऊरसारख्या चढ उतार अशा शार्प वळणावर भर पावसात ही स्पर्धा आयोजित करुन ती यशस्वी करणे हे खूप मोठे आव्हान आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशनसमोर होते.
ते पेलण्यात संस्था यशस्वी ठरली हे विशेष. या स्पर्धेसाठी दिवसरात्र मेहनत करणारी माझी कोअर टीम चंद्रशेखर जगताप सर, अजय भोसले, भुसारा सर, निखील गावडे, पंकज रिझवानी, गुरूप्रसाद देसाई, अनिकेत गद्रे, विनोद फर्डे, गजानन दांगट यांनी विशेष मेहनत घेतली.