नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. तिसऱ्यांदा शपथ घेत मोदींनी हॅटट्रीक साधली आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली आहे.
शिवाय, एनडीएतील घटक पक्षांसह देशाभरातील खासदार आणि बॉलिवडू सेलिब्रिटींनी पीएम मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. यावेळी पीएम मोदींनी पद आणि गोपिनियतेची शपथ घेतली. नवीन सरकारमध्ये एनडीएच्या विविध घटकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली होती, त्यानंतर हा शपथविधी सोहळा पार पडला आहे.