दिल्ली – भारत निवडणूक आयोगाने उद्या दुपारी ३ वाजता लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याकरिता पत्रकार परिषद जाहीर केली आहे. त्यामुळे उद्या दुपारी देशात निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असून निवडणुकीचा कार्यक्रम तसेच तारखाही जाहीर होणार आहेत.
2019 ची लोकसभा निवडणूक एप्रिल मध्ये होजन मतमोजणी 10 मे रोजी पूर्ण झाली होती. मागील लोकसभा निवडणुका सात टप्प्यात झाली होती.
त्यामुळे यंदाची निवडणूक नेमकी किती टप्प्यात पार पडते. महाराष्ट्रात नेमक्या कोणत्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. मुंबदी, ठाणे, कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मध्ये नेमके मतदान कधी होणार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निकाल कोणत्या दिवशी लागणार या साऱ्या प्रश्नांची उत्तरे उद्या दुपारी 3 नंतर मिळणार आहेत.