चिनी अंतराळयानाचे चंद्राच्या काळोख्या भागात यशस्वी लॅंडिंग

0

बिजिंग – चीनचे चांगई -६ मून हे अंतराळ यानाने आज सकाळी चंद्राच्या सर्वाधिक सर्वात अंधाऱ्या भागात यशस्वी लॅंडिग केले आहे. यासाठी या यानाला एक महिन्याचा कालावधी लागला. चीनच्या चंद्रमोहिमेचे सर्वात मोठे यश समजले जात आहे. हे लॅंडिग यशस्वी झाल्यानंतर आता चीन चंद्राच्या गडद बाजूचे नमुने आणणारा पहिला देश होणार आहे.

चीनच्या स्पेस एजन्सीनुसार, चांगई-६ लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुव-एटकेन बेसिनमध्ये उतरला. येथून ते चंद्राच्या पृष्ठभागाचे नमुने गोळा करण्यास सुरुवात करेल. तिथून तो चंद्रावरील दगडाचा २ किलोचा नमुना आणणार आहे. या आधी चीनचे लॅंडर २०१९ मध्ये चंद्रावर उतरले होते.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, चांगई-६ च्या यशामुळे चीन चंद्रावर तळ बांधण्यात अमेरिका आणि इतर देशांना मागे टाकू शकतो. चंद्रावरचे नमुने गोळा करण्यासाठी, लँडरमध्ये ड्रिल आणि खोदण्यासाठी आणि नंतर ढिगारा उचलण्यासाठी यांत्रिक हात बसवण्यात आला आहे. हा नमुना लँडरच्या सर्वात वरच्या भागात ठेवला जाईल.

यानंतर, चंद्राच्या या भागात दुसरे अंतराळ यान पाठवले जाईल आणि हे लँडर पृथ्वीवर परत आणले जाणार असून ते २५ जूनला मंगोलियामध्ये उतरणार आहे. चंद्राचा हा भाग गडद अंधारात असून तो खडबडीत असल्याने चंद्राच्या या भागावर उतरणे इतर भागांपेक्षा अवघड आहे. २०३० पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे.

 

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech