मुंबई : निवडणुकीचा हंगाम हा प्रत्येकासाठी नफा-तोट्याचा सौदा असतो. विशेषत: हेलिकॉप्टर सेवा देणा-यांसाठी हा लाभदायक काळ आहे. लोकसभा निवडणुकांचे सहा टप्प्यांसाठी मतदान पार पडले आहे. सातव्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होईल. ४ जूनला लोकसभेचे निकाल जाहीर होणार आहेत. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान अनेक नेत्यांनी हेलिकॉप्टरने दौरे केले. हेलिकॉप्टर ऑपरेटर या काळात भरपूर नोटा छापल्या.
दरम्यान, निवडणुकांच्या निकालासाठी ४ जून जवळ येईपर्यंत हा कमाईचा आकडा ३५०-४०० कोटींवर पोहोचू शकतो. निवडणूक प्रचारादरम्यान हेलिकॉप्टरच्या मागणीत मोठी वाढ होत असते. निवडणूक म्हटली की हेलिकॉप्टर ऑपरेटरसाठी कमाईचे दिवस सुरु होतात. हेलिकॉप्टर ऑपरेटरसाठी निवडणुकीचा काळ व्यस्त असतो. मागणी वाढ झाल्यामुळे चार्टरिंगचे दर ५० टक्क्यांपर्यंत वाढतात. हेलिकॉप्टरचे तासाला भाडे असते. मिळालेल्या माहितीनुसार ट्विन इंजिन असलेल्या ८ आसनी हेलिकॉप्टरची किंमत सुमारे ३ लाख रुपये प्रति तास आहे. आता ३ लाख रुपयांचा विचार केला तर १८० तासांसाठी हेलिकॉप्टरचे भाडे सुमारे ४-५ कोटी रुपये आहे.
यावेळची लोकसभा निवडणूक हेलिकॉप्टर ऑपरेटरसाठी सर्वाधिक कमाई करणारी ठरली असून या काळात त्यांच्या कमाईचा आकडा ३५०-४०० कोटी रुपयांच्या आसपास पोहोचू शकतो. निवडणूक प्रचारादरम्यान, ६-७ लोक बसण्याची क्षमता असलेल्या सिंगल इंजिन हेलिकॉप्टरचे भाडे ताशी १.३-१.५ लाख रुपये झाले आहे, तर ऑगस्टा या आठ आसनी हेलिकॉप्टरच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली जी ताशी २.३ ते ३ लाख होती.
निवडणूक प्रचारासाठी भाड्याने घेतलेल्या हेलिकॉप्टरच्या यादीतील तिस-या कॉन्फिगरेशनमध्ये १५ आसनी ऑगस्टा वेस्टलँडचा समावेश आहे आणि त्यांचे भाडे प्रति तास ४ लाख रुपये आहे. यावर्षी हेलिकॉप्टरची मागणी खूप वाढली आहे आणि राज्य पातळीवरही पक्षांकडून त्यांना मागणी येत आहे.निवडणुकीच्या वेळी हेलिकॉप्टर ऑपरेटर ४५-६० दिवसांच्या दीर्घ मुदतीसाठी करार करतात. जर एखाद्याने ६० दिवसांसाठी करार केला, तर त्यानुसार ऑपरेटरला १८० तासांचे उड्डाण मिळते.