नवी दिल्ली- दोन दिवसांपूर्वी देशातील १७ शहरांमध्ये उष्णतेची लाट होती.मात्र काल रविवारी देशातील पंजाब,हरियाणा, राजस्थान,उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील ३७ शहरांमध्ये दिवसाचे तापमान ४५ अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले.
विशेष म्हणजे राजस्थानच्या फलोदी शहरात सलग दुसऱ्या दिवशी ४९.८ अंश तापमानाची नोंद झाली.काल हे शहर देशातील सर्वात उष्ण शहर ठरले.हे तापमान सरासरीपेक्षा ६.८ अंश जास्त होते.त्याच्या एक दिवस आधी शनिवारी तर दिवसाचे तापमान ५० अंशांवर गेले होते.रविवारी संपूर्ण राजस्थानमध्ये तापमान ४३ अंशांपेक्षा जास्त राहिले. तसेच शिमल्यात रविवारी दिवसाचे तापमान ३०.६ अंशांवर नोंदवले गेले. हे या हंगामातील सर्वोच्च तापमान आहे.दिल्लीचा पाराही ४८.३ अंशांवर होता.