यंदाही १० वी बोर्डाच्या परीक्षेत मुलींची बाजी

0

पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, यंदा ९५.८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्य मंडळाने पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर केला. यंदा १ मार्च ते २६ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली.

यंदा १० वी बोर्डाच्या परीक्षेस पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून एकूण १५,६०,१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४९,३२६ विद्यार्थी या परीक्षेकरता प्रविष्ट झाले होते. यातील १४,८४,४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाच्या निकालाची एक्केवारी ९५.८१ एवढी आहे. मागील १० वी बोर्डाचा वर्षी ९३.२३ टक्के निकाल लागला होता. म्हणजेच, मागील वर्षाच्या तुलने यंदा टक्केवारीत १.६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech