स्वाती मालीवाल यांना बलात्कार व हत्येची धमकी

0

नवी दिल्ली – आम आदमी पार्टीकडून बलात्कार आणि हत्येची धमकी मिळत असल्याचा आरोप खासदार स्वाती मालीवाल यांनी केलाय. यासाठी मालीवाल यांनी जर्मनीतून ऑपरेट करणारा यूट्यूबर ध्रुव राठी याला जबाबदार धरलेय. मालीवाल यांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट करत हे गंभीर आरोप केले आहेत.

खासदार मालीवाल यांना 13 मे रोजी मुख्यमंत्री निवासस्थानी केजरीवाल यांचे निकटवर्तीय विभव कुमार यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीवर पोलिसांनी विभवकुमारला अटक केलीय. त्यांनंतर आज, रविवारी स्वाती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली की, “माझ्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी चारित्र्यहनन मोहीम सुरू केल्यानंतर आता मला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तक्रार मागे घेण्यासाठी मला धमकावले जात आहे. युट्यूबर ध्रुव राठीने माझ्या विरोधात एकतर्फी व्हिडिओ पोस्ट केल्यावर यात आणखी वाढ झाली आहे. माझी बाजू मांडण्यासाठी मी ध्रुव राठीला फोन केला, पण त्याने माझ्या कॉल्स आणि मेसेजकडे दुर्लक्ष केले. त्याच्यासारख्या स्वतंत्र पत्रकाराने ‘आप’च्या इतर प्रवक्त्यांसारखे वागणे लज्जास्पद आहे.”

ध्रुव राठीच्या व्हिडिओबाबत आपले मत मांडताना स्वाती मालीवाल यांनी काही मुद्दे मांडलेत. याबाबत त्यांनी काही मुद्दे मांडून प्रश्न उपस्थित केलेय. मारहाणीची घटना मान्य करुन आम आदमी पक्षाने यू-टर्न घेतला. एमएलसी (मेडिको-लीगल केस) अहवालात हल्ल्यामुळे झालेल्या जखमांची नोंद आहे. व्हिडिओचा एक भाग प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर आरोपीने फोन केला. आरोपी विभवकुमारला घटनास्थळावरून (मुख्यमंत्री निवास) अटक करण्यात आली. पुराव्याशी छेडछाड करण्यासाठी त्याला पुन्हा तिथे का जाऊ दिले ? तसेच जी महिला नेहमी योग्य मुद्द्यांसाठी उभी राहिली, अगदी सुरक्षेशिवाय एकटी मणिपूरला गेली, तिला भाजप कसे विकत घेईल ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech