काठमांडू – जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर सर करणाऱ्या २०० गिर्यारोहकांनी ८,७९० मीटर उंचीवर दक्षिण शिखर आणि हिलरी स्टेप गाठले. हे ठिकाण माउंट एव्हरेस्ट येथून २०० फूट अंतरावर असून तेथे गिर्यारोहकांनी गर्दी केल्याने येथे बर्फाचा काही भाग कोसळला. यावेळी ६ गिर्यारोहक अडकले. मात्र, यातील ४ जण दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यशस्वी झाले. २ गिर्यारोहक (एक ब्रिटिश आणि एक नेपाळी) हजारो फूट खाली पडून बर्फात गाडले गेले.
ही घटना २१ मे रोजी घडली होती, ज्याचा व्हिडिओ आता समोर आला आली. सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंतच एव्हरेस्ट चढाई करण्यासाठी वेळ दिला. त्यानंतर गिर्यारोहकांची शिखर गाठण्यासाठी चढाई सुरु झाली. यावेळी ही दुर्घटना घडली. ४ दिवसांपासून बर्फात अडकल्यामुळे दोन्ही गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेपाळच्या पर्यटन अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे दोघेही एव्हरेस्टवर चढणाऱ्या १५ गिर्यारोहकांच्या गटातील होते.बर्फाचा काही भाग कोसळला, तेव्हा ते दक्षिण शिखराच्या दिशेने पडले. याला टेकडीचा डेथ झोन म्हणतात. तिथे ऑक्सिजनची पातळी खूप कमी असते. प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरावर फक्त दोन मिनिटे थांबण्याची परवानगी होती. एरवी गिर्यारोहकांना एव्हरेस्टच्या शिखरावर थांबण्यासाठी फक्त १० मिनिटे दिली जातात.