नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या रेमल चक्रीवादळ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ओडिसा, बंगाल, त्रिपुरा, दक्षिण मणिपुर आणि मिझारोममध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. रेमल वादळामुळे हवामान बदल झाला असून कोलकातामधील नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ आज दुपारी १२ ते उद्या रात्री ९ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे येथीस ३९४ उड्डाणेदेखील रद्द करण्यात आली आहेत. पूर्व आणि दक्षिण पूर्व रेल्वेने खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण आणि उत्तर २४ परगणा आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या आहेत. पूर्व मेदिनीपूर, सुंदरबन, पश्चिम बंगालमधील त्रिपुरा आणि ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये रेमल चक्रीवादळाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील रहिवासी आणि पर्यटकांना एनडीआरएफचे पथक सुरक्षित स्थळी नेत आहेत.