देशातील ३८० मतदारसंघातील मतदानात फेरफार?

0

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यातील एकूण ३८० लोकसभा मतदारसंघात १ कोटी ७ लाख मतदान वाढले असून यावरून मतदान प्रक्रियेत फेरफार झाल्याचा आरोपाला पुष्टी मिळत असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस खासदार जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

‘एक्स’ या सोशल मीडियावर म्हटले की, एक कोटी सात लाख मते वाढल्याचा अर्थ ३८० मतदारसंघात प्रत्येकी २८ हजार मतांची भर पडली आहे. ही संख्या खूप जास्त आहे. मतांमधील तफावत ज्या राज्यांमध्ये भाजपचे उमेदवार हरण्याच्या स्थितीमध्ये होते. या मतदारसंघांमध्ये ही तफावत सर्वाधिक असल्याचा आरोपही खासदार जयराम रमेश यांनी केला आहे.

मतदानाचे चार टप्पे संपल्यानंतर लगेच मतदानाची आकडेवारी जाहीर होणे अपेक्षित असताना १० ते १२ दिवसांनी ही आकडेवारी जाहीर केली जात आहे. यातही मतदानात वाढीव संख्या दाखविली जात आहे. निवडणूक आयोगाने गहाळ झालेल्या ईव्हीएम मशीनबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसल्याने आयोगाच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल संशय निर्माण होत असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ता पवन खेडा यांनी म्हटले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech