इंडिगोच्या विमानात प्रवाशावर उभे राहून प्रवास करण्याची वेळ

0

नवी दिल्ली- बस किंवा ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या जास्त असल्यानंतर उभ्याने प्रवास करणारे प्रवासी आपण रोजच पाहत असतो. मात्र चक्क एका विमानात असा प्रकार प्रत्यक्ष घडला. इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात एका व्यक्तीला सीट न मिळाल्याने विमानात उभे राहून प्रवास करण्याची वेळ आली होती.

हे विमान मुंबईहून वाराणसीला जात होते. विमानाने उड्डाण घेण्यापूर्वीच एका क्रू मेंबरला विमानात उभा असलेला एक प्रवासी दिसला. कर्मचार्यांनी याबाबत वैमानिकाला माहिती दिली. यानंतर विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतावे लागले. त्यानंतर विमान परतल्यावर प्रवाशांना येथे उतरवण्यात आले. यानंतर विमान कंपनीने सर्व प्रवाशांचे केबिन सामान तपासले.यात विमानाला एक तास उशीर झाला. विमानाचे पूर्ण बुकिंग झाले असताना या प्रवाशाला तिकीट दिले असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान,या घटनेबाबत इंडिगो कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे.इंडिगो प्रवक्त्याने सांगितले की, विमान सुटण्यापूर्वी ही चूक लक्षात आली आणि प्रवाशाला खाली उतरवण्यात आले. मात्र यामुळे उड्डाणाला थोडा उशीर झाला. एअरलाइन आपल्या ऑपरेशनल प्रक्रिया मजबूत करण्यासाठी सर्व शक्य ती पावले उचलत आहे.इंडिगो एअरलाइन्स प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech