पंतप्रधानांची सभा असल्याने आज कल्याणचा रस्ता बंद !

0

 

ठाणे – महायुतीचे कल्याणचे लोकसभा उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या बुधवार १५ मे रोजी कल्याण येथील व्हरटेक्स मैदान येथे येणार आहेत. या सभेमुळे ठाणे आणि कल्याण परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल केले आहेत.यादिवशी सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत तळवली पडघा येथून कल्याणला जाणारा रस्ता संपूर्णपणे बंद राहणार आहे.

यादिवशी कोणतेही वाहन या रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना सर्व आस्थापनांना देण्यात आल्या असून त्यांनी या कालावधीत पर्यायी रस्त्याचा वापर करावा,असे आवाहन करण्यात आल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ.विनय राठोड यांनी दिली.तसेच यादिवशी नाशिककडून खारेगाव टोलनाका येथून डावे वळण घेउन मुंब्रा बायपासमार्गे जेएनपीटी तसेच इतर ठिकाणी जाणाऱ्या मार्गावरील सहा चाकी आणि त्यापेक्षा जास्त चाकांवरील माल वाहतूक करणाऱ्या सर्व माेठया वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद राहणार आहे. त्याऐवजी ही वाहने खारेगाव टोलनाका येथून डावीकडे न वळता मुलूंड ऐरोलीमार्गे पुढे जातील.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech