“तुम्ही ठरवलं तरच बदल घडेल” अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन

0

पुणे – सुप्रिसद्ध अभिनेता सुबोध भावे यानेही पुण्यात मतदानाचे कर्तव्य पार पाडले. सुबोध भावे आणि त्याच्या पत्नीने मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्याने जास्तीत लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. सध्याच्या राजकारणावर काहीही बोलणं मात्र त्याने टाळलं.

अभिनेता सुबोध भावे याने पुण्यातील सिटी पोस्ट जवळील मतदान केंद्रावर पत्नीसह मतदानाचे कर्तव्य पार पडले. त्यानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधला. ‘ आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा मतदान करायला मिळालं तेव्हा मला सर्वात जास्त आनंद झाला होता. तेव्हापासून कुठलीही निवडणूक असली तरीही मी आणि माझ्या घरातले सर्वजण मतदान करतो, कोणतेही मतदान आम्ही बुडवत नाही. मतदान हे आमचे राष्ट्रीय आणि प्रथम कर्तव्य आहे, याची जाणीव आम्हाला आहे. जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा असं मी मतदारांना आवाहन करीन, कारण तुम्ही जर ठरवलं तरच बदल घडू शकेल’ असे सुबोध भावे याने सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech