वरळीतून आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवून दाखवावी

0

मुंबई: लोकसभा निवडणुकीचे राज्यातील तीन टप्पे पार पडल्यांनंतर आता विधानसभेचे पडघम वाजू लागल्याचं दिसतंय. राज्याच्या सहकार खात्याने अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचं एसटी बँकेचं संचालकपद रद्द केल्यानंतर सदावर्तेंनी आता थेट आदित्य ठाकरेंना आव्हान दिलंय. येणाऱ्या विधानसभेमध्ये मी आदित्य ठाकरे यांना चॅलेंज देतो, येणाऱ्या वरळी विधानसभेमध्ये त्यांनी डिपॉजिट जप्त करून दाखवावं. आदित्य ठाकरेंचं डिपॉजिट जप्त नाही केलं तर मी मिशा ठेवणार नाही असं थेट आव्हान अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी दिलंय.

अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, तुम्ही वीर जिजामाता नगरमध्ये येऊन पाहा, सदावर्तेच्या मागे किती शक्ती आहे. उद्धव ठाकरेंच्यामागे एकही माणून दिसणार नाही. वरळीमध्ये अंतर्गत खूप काम सुरू आहे, आदित्यच्या पायाखालची वाळू सरकली आहे. वरळीतून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढून दाखवावी. पहिल्या 25 टक्के मतमोजणीतच आदित्य ठाकरे रडत रडत घरी जातील. त्यांचं डिपॉजिट जप्त करणार. आमचं संचालक पद रद्द केलेलं नाही, सर्व बातम्या खोट्या असून त्या बातमीचा निषेध करतो असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. तक्रारदार संदीप शिंदे हे शरद पवारांच्या ताटाखालचं मांजर असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

 

 

 

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech