अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे जाणार राज्यसभेवर
पुणे : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने अशोक चव्हाण, डॉ. अजित गोपछडे आणि मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी निश्चित केली आहे.
राज्यसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यास अवघे 48 तास शिल्लक असताना भाजपाने ही नावं जाहीर केली आहेत. नुकतेच काँग्रेसमधून भाजपामध्ये (BJP) आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) अपेक्षेनुसार भाजपाचे राज्यसभा खासदार होतील. राज्याचे उच्च-तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड मतदारसंघ सोडणाऱ्या माजी आमदार आणि महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni ) आणि भाजपाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे (Ajit Gopchde) अधिकृत उमेदवार घोषित झाल्याने या तिघांचीही राज्यसभेवर निवड होणार, हे निश्चित झालं आहे.
भाजपा चौथा उमेदवार देऊन विधान परिषदेप्रमाणेच राज्यसभा निवडणूकही चुरशीची करणार, अशा राजकीय चर्चांना या तिघांनाच उमेदवारी मिळाल्याने पूर्णविराम मिळाला आहे.