ठाणे – महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज सकाळी मासुंदा तलाव (तलावपाळी) येथे जॉगिंग ग्रुपला येणाऱ्या नागरिकांची व ज्येष्ठ नागरिकांची भेट घेतली. त्यानंतर ठाणे मार्केट व ठाणे स्टेशन या ठिकाणी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. ठाणेकरांची सत्यलाच साथ देणार असा विश्वास यावेळी व्यक्त केला. राजन विचारे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खासदार राजन विचारे यांना आपणच पुन्हा निवडून देणार अशी ग्वाही मतदारांनी खासदार राजन विचारे यांना दिली.
यावेळी प्रकाश पायरे, सुरेश मोहिते, राम काळे, जिवाजी कदम, विजय हंडोरे, राजीव शिरोडकर शांताराम शिंदे, राजेंद्र महाडिक, सचिन चांदगुडे, संजीव कुलकर्णी, प्रतिक राणे, रमेश शिर्के, आशिष वैती, जग्ग्नाथ तावडे, संजय दळवी, अमोल हिंगे, , दीपक क्षत्रीय, प्रीतम रजपूत, राजेश कदम, महेश म्हात्रे, रचनाताई वैद्य तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.