ठाणे – ठाण्याचे जिल्हाधिकारी श्री अशोक शिनगारे यांना ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शाल, सन्मानचिन्ह देऊन आज सन्मानित करण्यात आले.
यावेळी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, दैनिक पुढारीचे ठाण्याचे ब्युरो चीफ दिलीप शिंदे, जनमुद्राचे संपादक डॉ. दीपक दळवी ,छायाचित्रकार किस्तु फर्नांडिस आदीं उपस्थित होते.
ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या ३० मार्च २०२४ रोजी आयोजित पत्रकार मेळाव्याचे ठाण्याचे जिल्हाधिकारी मा.अशोक शिनगारे हे प्रमुख पाहुणे होते. मात्र अचानक केंद्रिय निवडणूक आयोगाच्या महत्वाच्या कामासाठी त्यांना कल्याणला जायचे होते. ते सकाळी १०.३० वाजता पत्रकारांच्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले, मात्र त्यावेळी नियोजित कार्यक्रमानुसार ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या नियोजित सर्वसाधारण सभा सुरू होती. सभेनंतर पत्रकार मेळावा असल्याचे जिल्हाधिकारी शिनगारे यांना संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी शुभेच्छा संदेश देऊन केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामासाठी कल्याणला गेले होते.
त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांची भेट घेऊन त्यांना पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.