वसंतदादांनी छातीवर गोळ्या झेलून सांगलीमध्ये काँग्रेस रुजवली

0

सांगली – “आज काँग्रेस कार्यकर्ता म्हणून एक वाईट दिवस आहे. वसंतदादांनी छातीवर गोळ्या झेलून सांगलीमध्ये काँग्रेस रुजवली, वाढवली. महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रसार केला. विशालदादांनी सांगलीपासून दिल्लीपर्यंत व्यथा मांडली. वस्तुस्थिती सांगितली. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विश्वजीत कदम, जयश्री वहिनी, विक्रम दादा यांचा इतिहास जाणून घेतला नाही. वाईट गोष्ट घडली” अशी व्यथा शशिकांत नागे या काँग्रेस कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. सांगलीची जागा ठाकरे गटाला गेली आहे. इथून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. ग्राऊंड लेव्हलवर काँग्रेसची ताकद आणि उमेदवार शिवसेनेचा असं इथे झालय.

“हा निषेधार्ह आहे. वरिष्ठ काँग्रेस नेते जो निर्णय घेतील, त्याला आम्ही बांधील आहोत. पण जे घडलं, ते अत्यंत वाईट घडलं. सांगली जिल्हा हा वसंतदादाचा जिल्हा, पंतगराव कदम यांचा जिल्हा, मदनभाऊंचा जिल्हा, विश्वजीत कदम यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याचा इतिहास जरा सुद्धा तपासला नाही. हे अत्यंत निंदनीय आहे. सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मी आज निषेध करतो” असं शशिकांत नागे म्हणाले.

“हा इथला कायकर्ता स्वयंभू, घरंदाज आहे. काँग्रेसची परंपरा असलेला जिल्हा आहे. डोळेभरुन आले, रडायचा राहिलोय, वेळ आल्यावर उद्रेक होईल. विशाला पाटील यांना उमेदवारी मिळू नये, म्हणून ज्यांनी कट कारस्थान केली, त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार” असा इशारा शशिकांत नागे यांनी दिला. विशाल पाटील, विश्वजीत कदम नाराज झाले आहेत. विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. विशाल पाटील, विश्वजीत कदम दोघेही नॉट रिचेबल झाले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech