ठाणे – नव्या युगाची कवयत्री, लेखिका शिवानी गोखले यांचे पाहिले वहिले ‘ वाट माझिया घराची ‘ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे दिनांक 13 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे.
वाट माझिया घराची
कोणी शोधत येईल
दरवळ कवितेचा
त्यास वेढून घेईल…
अशा गोड शब्दात कवयत्री, लेखिका शिवानी गोखले यांनी त्यांच्या पहिल्या वहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रण दिले आहे. नव्या युगाची भाषा करणाऱ्या, नव्या विचारांची बैठक असणाऱ्या शिवानी गोखले यांच्या ‘ वाट माझिया घराची ‘ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी 13 एप्रिल रोजी ठाण्यात होणार आहे. मिनी थिएटर, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह याठिकाणी संध्याकाळी 5 ते 7 या वेळात होणार आहे. पुण्यातील बुकगंगा संस्थेकडून हे पुस्तक प्रकाशित होत असून अभिनेते सागर तलाशिकर यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे. तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. मिलिंद मराठे उपस्थित राहणार आहेत. सर्व रसिकांनी या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण शिवानी गोखले यांनी दिले आहे.