ठाणे – चैत्र महिना सुरु झाला की, नववर्षाच्या स्वागताबरोबर सर्वांना वेध लागतात ते चैत्र नवरात्रोत्सवाचे दरवर्षी ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणाऱ्या चैत्र नवराञोत्सवास लाखो भावीक देवीच्या दर्शनाला येत असतात. ठाण्याच्या या चैत्र नवरात्रोत्सवाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे यंदाचे हे सतरावे वर्ष व यापूर्वी चरई येथे १२ वर्ष अशी एकूण २९ वर्ष हा चैत्र नवरात्रोत्सव साजरा करीत आहोत. या चैत्र नवरात्रोत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याने होत आहे. *मंगळवार दि.०९ एप्रिल २०२४ ते रामनवमी बुधवार दि. १७ एप्रिल २०२४* पर्यंत चालणाऱ्या या नवरात्रोत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात. येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी या देवीची ख्याती आहे. “भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी” हि देवी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक राज्यातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात.
आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. सुप्रसिध्द प्रधानाचार्य व यज्ञाचार्य वे. शा. सं. मुकुंदशास्ञी मुळे (नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यदिव्य नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग संपन्न होणार आहे.
चैत्र नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिराच्या प्रतिकृतीचे दर्शन घडवित आहेत. या मंदिराची उंची ७० फूट असणार आहे. देवीचा सभा मंडप २४×२४ फुटाचा असणार आहे. त्यामध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा गाभारा १६×१६ फुटाचा असणार आहे.
४०X४०`नऊ’ हवनकुंड असलेला मंडप आणि त्या भोवतालचा प्रदक्षिणा मार्ग असणार आहे. या हवन कुंडाला १०८ परिक्रमा पुर्ण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. या सर्व ठिकाणी भक्तांच्या सोयीचे सुद्धा भान ठेवण्यात आले आहे. त्या व्यतिरीक्त मुख्य मंदिरा भोवतालचा संपूर्ण भाग प्रतिष्ठीत व्यक्तींसाठी बनविलेला कक्ष, करमणूकीचा रंगमंच, संपूर्ण तलावपाळी परिसराला विद्युत रोषणाई करून लेझर शो करण्यात येणार आहे आणि चौकात दाक्षिणात्य शैलीचा वापर करुन सुशोभीत करण्यात आले आहेत.
शंभरहून अधिक कारागीर घेऊन अहोरात्र काम करीत आहेत. फायबर, प्लायवूड, कपडा, रंग, ई. वस्तुंचा वापर करुन ही सुंदर कलाकृती साकारण्यात येत आहे.
श्री. नरेंद्र बेडेकर व सौ.आश्विनी कानोलकर यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमाची रुपरेखा आखण्यात आली आहे.
देवीचे आगमन
मंगळवार दि. ०९ एप्रिल २०२४* रोजी देवीचे आगमन कळवा येथून सकाळी १० वाजता वाजत गाजत होणार आहे. यासाठी ३०० जणांचे लेझीम पथक जय्यत तयारीत आहे. तसेच तसेच संपूर्ण ठाणे जिल्हयातून वारकरी सांप्रदायाचे वारकरी पथके, झांज पथक, बँड पथक, दांडपट्टा, महिलांचे व पुरुषांचे लेझीमपथक, घोडेस्वार, मावळे अशी जय्यत तयारी देवीच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.
चैत्र नवरात्र उत्सवाच्या या नऊ दिवसात रोज सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 व दुपारी 3.00 ते सायं. 5.30 वा. या कालावधीत नऊ कुंडांवर होम हवन केले जाईल. तसेच सायंकाळी 5.30 ते 6.00 वाजता देवीची आरती होईल. *बुधवार दि. १७ एप्रिल २०२४* रोजी दुपारी 3.30 ते 4.30 पर्यंत पुर्णाहूती विधी संपन्न होणार आहे.या नऊ दिवसात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच रोज होणाऱ्या सहस्त्रचंण्डी महायागास व सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी 6 नंतर छत्रपती शिवाजी मैदान, रंगो बापूजी गूप्ते चौक, तलाव पाली, जांभळी नाका, ठाणे येथे होणार आहेत. तरी आपण उपस्थित राहून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
चैञी नवरात्रोत्सवाच्या या भव्यदिव्य कार्यक्रमाचे विविध चॅनेल्स, वृत्तवाहिन्यांवरुन थेट प्रक्षेपण होणार आहे.
*नवरात्रोत्सवानिमित्त सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम रुपरेषा*
*मंगळवार दि. ०९ एप्रिल २०२४ रोजी* कोळीगीते – संतोष चौधरी प्रस्तुत “दादूस आला रे” हा कार्यक्रम तसेच कोळी समाजातील मान्यवरांचा सन्मान होणार आहे.
*बुधवार दि. १० एप्रिल २०२४* रोजी ह. भ. प. श्री निवृत्तीमहाराज इंदूरीकर, यांचे वारकरी किर्तन. तसेच वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा सन्मान होणार आहे.
*गुरुवार दि. ११ एप्रिल २०२४* रोजी आंतरराष्ट्रीय लोक गायक रविन्द्र सिंह ज्योति व लोकगायक मुकेश त्रिपाठी आणि लोक गायिका रागिनी प्रजापती यांचा कार्यक्रम तसेच उत्तर भारतीय समाजातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
*शुक्रवार दि. १२ एप्रिल २०२४* रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ठाणे लोकसभा क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना `नवदूर्गा’ पुरस्काराने तर कर्तृत्ववान पुरुषांना `नवरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
*शनिवार दि. १३ एप्रिल २०२४* रोजी आशाजी भोसले यांचा मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम किरण वेहेले प्रस्तुत “आशा…. आपली….अपनी….” कार्यक्रम
*रविवार दि. १४ एप्रिल २०२४* रोजी जुन्या व नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम किरण वेहेले प्रस्तुत “कलर्स ऑफ बॉलीवूड.” कार्यक्रम
*सोमवार दि. १५ एप्रिल २०२४* रोजी निलेश ठक्कर प्रस्तुत – गुजराथी दांडिया रास गरबा व गुजराथी, राजस्थानी, मारवाडी, कच्ची जैन, समाजातील मान्यवरांचा सन्मान तसेच वैष्णवाचार्य पु. पा. गो. १०८ श्री. द्रुमिलकुमारजी महोदयश्री यांची उपस्थिती लाभणार आहे.
*मंगळवार दि. १६ एप्रिल २०२४* रोजी भोंडला आणि मराठमोळा दांडीया सादरकर्ते श्रावणी महाजन प्रस्तुत “साद स्वरांची” कार्यक्रम प्रमुख उपस्थिती मा. श्री. आदेशजी बांदेकर व सौ.सुचित्रा बांदेकर.
बुधवार दि. १७ एप्रिल २०२४* रोजी मराठी सांस्कृतिक परंपरेच दर्शन घडविणारा नृत्याविष्कारमय सोहळा किरण वेहेले प्रस्तुत “रंगात रंग रंगला महाराष्ट्र अमुचा” कार्यक्रम
गुरुवार दि. १८ एप्रिल २०२४ रोजी* सायं. 5.00 वाजता देवीची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. आपण या उत्सवास सहकुटूंब सहपरीवार उपस्थित राहून देवी दर्शनाचा व सहस्ञचंण्डी महायागाचा लाभ घ्यावा असे आवाहन आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.