एसटीची केलेली दरवाढ म्हणजेच ही गरीब जनतेची लूट – वडेट्टीवार

0

नागपूर : एसटी ही महाराष्ट्रातील जनतेची जीवनवाहिनी आहे. गरीब, मजूर, महिला, कामगारांसाठी एसटी असताना त्यांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे एसटी दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. नागपूर इथे पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की एसटी मध्ये भ्रष्टाचार होत आहे, बस खरेदीचे कंत्राट आता सरकारने रद्द केले. एसटी महामंडळात होणाऱ्या भ्रष्टाचाराला सरकार खतपाणी घालत आहे, ह्यात एसटीचा तोटा होत नाही का ? याचा भार गोरगरीब, सामान्य जनतेवर सरकार का लादत आहे, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

एसटी दरवाढ ही गरिबांची लूट आहे, म्हणून ही दरवाढ मागे घ्यावी, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबत सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार आहे. यावेळी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवले पाहिजे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० हजार जागा या ओबीसींच्या हक्काच्या आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नये, असे झाले तर ओबीसी समाज हे सहन करणार नाही, असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी दिला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech