प्रयागराज : कोट्यवधी भाविकांना प्रवित्र स्नानाचे पुण्य देणारा महाकुंभ मेळा १३ जानेवारी रोजी सुरु झाला आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे होणार्या या महाकुंभसाठी देशविदेशातून भाविक हजेरी लावणार आहेत. गंगा- यमुना या दृश्य व सरस्वती या अदृश्य नद्यांच्या संगमावर याचे आयोजन केले आहे. जवळपास ४० कोटीहून अधिक भाविक या महाकुंभमेळ्यास हजेरी लावतील असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जमणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन करणे तितकेच कठीण काम आहे. गेले वर्षभर या सोहळ्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. यासाठीची केलेली ही तयारीही अंचबित करणारी आहे. प्रयागराजमध्ये येणाऱ्या भाविकांचा आकडा हा दररोज वाढताना दिसून येत आहे. आतापर्यंत गंगा,यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमात ८.८१ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली.
या महाकुंभ मेळयाची तयारी गेले वर्षभर सुरु होती. प्रयागराज शहराची लोकसंख्या ६० लाख आहे. पण सोहळ्यासाठी ४० कोटी भाविक येणार म्हणून गंगा यमुनेच्या दोन्ही तिरांवर ४ हजार हेक्टर जमिनीवर एक शहर वसवले आहे. यामध्ये १,६०,००० तंबू उभारले आहेत. तर १,५०,००० हजार शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी १२४९ किलोमिटर या महाकुंभसाठी येणार्या भाविकांच्या सोईसाठी केंद्र सरकारने टे्रनची विशेष व्यवस्था केली आहे.यासाठी सव्वा महिन्यात १३१०० साध्या रेल्वेच्या फेर्या होतील तर ३००० विशेष रेल्वेची सोय केली आहे. देशभरातून ७ हजार बसेस ये- जा करणार आहेत. या बसेससाठी ७ नव्या बसस्टॉपची सोय केली आहे. दोन्ही तिरांवर ये – जा करण्याठी ३० तरंगते पूल बांधले आहेत.इतक्या लांबीची पाईपलाईन टाकली आहे.
यापूर्वी २०१३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत अनेक लोक मारले गेले होते. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून २७०० कॅमेरे बसवले आहेत. हे कॅमेरे हाताळण्यासाठी शेकडो एर्क्पट अभियंते याचे ऑपरेटींग करणार आहेत. कुठेही गर्दी झाली किंवा चेंगराचेंगरी झाली की तत्काळ आपत्ती दलांना अलर्ट केले जाणार आहे. तसेच सुरक्षेची जबाबदारी १००० पोलिस अधिकारी सांभाळत आहेत. चेकपॉईंटवर प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाणार आहे. प्रचंड मोठ्या गर्दीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचीही मदत घेतली जाणार आहे. अवकाशात फिरणारे ड्रोन नजर ठेवतीलच पण पाण्यातही काही दुर्घटना घडू नये म्हणून अडंरवॉटर ड्रोनही उपयोगात आणले जाणार आहेत. हे ड्रोन १०० मिटर खोलपर्यंत गोता मारु शकतात व आपल्या चारही बाजूला नजर ठेवू शकतात. यामुळे पाण्यात होणारी दुर्घटनाही टाळता येणार आहे.