मुंबई : १९९७ साली प्रदर्शित झालेला आणि भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित असलेला ‘बॉर्डर’ हा सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे.जवळपास २७ वर्षानंतर आता या देशभक्तीवर आधारित चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘बॉर्डर २’ चं अधिकृतपणे शूटिंग सुरू झालं आहे. या चित्रपटात अभिनेता वरूण धवन देखील दिसणार आहे.वरुणने ‘बॉर्डर-२’ च्या शूटिंगला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर वरुण धवनचा सेटवरील पहिला फोटो समोर आला आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच सनी देओलनं ‘बॉर्डर’मध्ये तो पुन्हा आपल्या भूमिकेत परतणार असल्याचं जाहीर केलं होतं. याआधी २४ डिसेंबर रोजी चित्रपटाच्या निर्मात्यांनी सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी अभिनीत ‘बॉर्डर २’ चित्रपटाच्या शूटिंगची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. या चित्रपटाच्या शूटिंगमुळे चाहत्यांचा उत्साह वाढला आहे
नुकतीच ‘टी- सिरीज’द्वारे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये अभिनेता वरुण धवन, दिग्दर्शक अनुराग सिंग, प्रसिद्ध निर्माते भुषण प्रधान आणि निधी दत्ता दिसत आहे. ‘टी- सिरीज’ च्या सोशल मीडिया अकाउंटवर ऍक्शन, धैर्य आणि देशभक्ती…अभिनेता वरुण धवनने बॉर्डर-२ च्या शूटिंगला सुरुवात केली आहे…. असं कॅप्शन देत पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ‘बॉर्डर-२’ येत्या २३ जानेवारी २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन धुरा जेपी दत्ता नाही तर अनुराग सिंह करणार आहेत.