बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी संबंधीत लोक असल्याचा दावा केला जातोय. देशमुख यांच्या हत्याकांडात राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याचे नाव समोर आले होते. त्यामुळे तातडीनं चाटेची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. तसेच देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर आरोप केले जात आहेत. वाल्मिक कराडचे मंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीशी संबंध आहेत. त्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली आहे. याबाबातची माहिती राष्ट्रवादीच्या जिल्ह्याध्यक्षांनी देताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केल्याचे सांगितले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं आहे. याचे धक्के आता दिल्लीपर्यंत गेले आहेत. देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आली आहे. आज (ता.१५) पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री धनंजय मुंडे परळीकडे निघाले. यामुळे उलट सुलट चर्चांना उत आला आहे.देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे मंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीशी संबंध आहेत. त्यामुळे आता पक्षाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली आहे. पक्षाची बदनामी होत असल्यानं आता सुनील तटकरेंनी जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे. तटकरे यांनी, जोपर्यंत नव्या जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होत नाही, तोपर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रवादीची कमान आता राजेश्वर चव्हाण यांच्याकडे जिल्हाध्यक्ष म्हणून दिली आहे.
बीड हत्याकांडासह अनेक हिंस्त्र आंदोलनात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश दिसून येत आहे.यामुळे जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहतील, असंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळवण्यात आलं. तसेच, यापुढील पक्षात तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची निवड चारित्र्याची पडताळणी करून केल्या जाव्यात, अशा सूचना प्रदेशाध्यक्षांकडून दिल्याचं सांगितलं जात आहे.जिल्हा कार्यकारणी बरखास्त करणे, हा धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जातो आहे.दरम्यान, धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतली असून काही सूचना केल्याचे कळत आहे. तर आज होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला न थांबला ते परळीसाठी रवाना झाले. यामुळे धनंजय मुंडे परळीत आता कोणती भूमीका घेणार यासह त्यांचा पक्ष राजीनामा घेणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.