अमरावती : अमरावती जिल्हयातील अंजनगाव तालुक्यात बांग्लादेशी रोहिंग्यांना जन्मनोंदणी करून दिल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरीट सोमय्या आक्रमक सुरू लावत चौकशी करण्याची मागणी केली होती. अंजनगाव येथील तहसिलदारांनी बंगलादेशी रोहिंग्यांना जन्मनोंदणी बाबत आदेश दीले असल्याचा आरोप भाजप नेते डॉ किरीट सोमय्या यांनी केल्या नंतर गेल्या चार दिवसांपासून अंजनगाव तालुक्यात मोठी खळबळ माजली असून या संदर्भात असलेल्या प्रशासनातील सर्व विभाग ॲक्शन मोडवर आले आहे या प्रकाराबाबत चौकशी सुरू असली तरी याबाबत माहिती घेण्यासाठी किरीट सोमय्या हे सोमवारी (ता.१३) येथील तहसील कार्यालयात दाखल होऊन त्यांनी या प्रकरणांचा तपास करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या चौकशी पथकातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली.
सोमय्या आज, सोमवारी सकाळी तहसील कार्यालयात पोहोचले. यावेळी तहसिलदार पुष्पा सोळंके यांच्या समक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या चौकशी पथकाचे प्रमुख उपविभागीय अधिकारी सध्या प्रभारी असलेले रविंद्र कानडजे, उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर,प्रभारी गटविकास अधिकारी कल्पना जायभाये हे उपस्थित होते. सुमारे तासभर सोमय्या यांनी या प्रकरणी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बाहेर पडताच पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनी रोहिंगे नोंदी झाल्या असल्याच्या आपल्या आरोपावर आपण ठाम असून मालेगावमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात व्होट जिहाद फंडिंग घोटाळा उघडकीस आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या सदस्यांची सभा होऊन चौकशी सुरु करण्यात आल्याचे समजले असून तहसील कार्यालयात दाखल झालेल्या प्रकरणातील दाखले देण्याचे आदेश झालेली प्रकरण व पेंडिंग असलेली सर्व प्रकरणांच्या संपूर्ण कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार असल्याचे समजले.
अंजनगाव शहरात वीस हजार मुस्लिम संख्या असताना चौदाशे अर्ज आले आहे. आता याबाबत एसआयटी चौकशी होऊन कारवाई होणार, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. २२०० कोटी रुपये जिराद मोहम्मद व मोहम्मद बगाड यांच्या खात्यात आले होते आणि त्यातील ३१९ कोटी रुपये मुस्लिम संस्था व व्होट जिहाद या कामासाठी वापरण्यात आला. त्यातील काही पैसा बांगलादेशी रोहिग्यासाठी जन्माचा दाखला यासाठी असे तपासात समोर आले. यात २०२४ च्या शेवटच्या चार महिन्यात नऊशे लोकांना जन्माचे दाखले देण्यात आले. त्यातील ९९ टक्के हे मुस्लिम होते त्याची चौकशी केली तर लक्षात आले की हे फार मोठे छळयंत्र आहे. याबाबत वर्तमान पत्रात जाहिरात द्यावी लागते आणि त्या जाहिरातीमुळे हा प्रकार अंजनगावच्या एका कार्यकर्त्याने दहा दिवसांपूर्वी आमच्या लक्षात आणून दिली. तेव्हा हा प्रकार समोर आला.