परभणीतील उमेदवार वंचितने तिसऱ्यांदा बदलला

0

परभणी: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी राजकीय पक्ष जाहीर केलेले उमेदवार मागे घेऊन नव्या चेहऱ्यांची घोषणा करत आहेत. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष आघाडीवर आहे. वंचितकडून घोषणा करण्यात आलेला तिसरा उमेदवार बदलण्यात आला आहे. वंचितने गुरुवारी परभणी लोकसभा मतदारसंघातील आपला उमेदवार बदलत नवा ट्विस्ट आणला.

यापूर्वी वंचितने परभणीतून बाबासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, आता त्यांच्याजागी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंजाबराव डख यांनी गुरुवारी परभणीतून वंचितचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला. परभणीत महाविकास आघाडीकडून संजय उर्फ बंडू जाधव आणि महायुतीकडून महादेव जानकर हे रिंगणात आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech