परभणीचे उमेदवार करोडपती

0

परभणी – रासपचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी दि. १ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकर यांना फकिराची उपमा दिली होती. परंतु जानकर यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून ते फकीर नव्हे तर करोडपती असल्याचे समोर आले आहे.  महायुतीच्या वतीने परभणी लोकसभेसाठी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महादेव जानकर मूळचे पळसवाडी (जिल्हा सातारा) येथील रहिवासी असून त्यांनी वालचंद कॉलेज, सांगली येथून डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची डिग्री पूर्ण केली आहे. त्यांनी दिलेल्या शपथपत्रात आपला व्यवसाय शेती हा दर्शवला आहे. त्यांच्या नावावर १८ एकर १४ गुंठे एवढी शेती असून त्यांच्याकडे चल आणि अचल दोन्ही मिळून जवळपास ५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती शपथपत्रात नमूद करण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech