नाशिक : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे शनिवारी नाशिक मध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना नंतर पत्रकारांशी बोलताना आमदार आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरती जोरदार हल्ला केला. काही दिवसांपूर्वी कोकाटे यांनी पत्रकारांशी बोलतांना पक्षाने छगन भुजबळ यांचे भरपूर लाड पुरवले असून आणखी किती लाड करायचे? असे म्हणत टोला लगावला होता. तसेच माझे नेते अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, बाकी कोणी नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले होते. राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिले असून ते म्हणाले आहे की मला पक्षाने काही आदेश दिलेले आहेत त्यामुळे भुजबळ यांना मी उत्तर देणार नाही पण भुजबळ यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे माझ्याकडे आहे हे भुजबळ यांना माहिती आहे त्यामुळे मला यावर काहीही जास्त बोलायचे नाही असे सांगून एक प्रकारे राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी भुजबळ यांना एक जबरदस्त उत्तर दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
त्यानंतर कोकाटे यांच्या टीकेला आमदार छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर देतांना,”माणिकराव कोकाटे यांना मला सांगायचं आहे की मी शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक सदस्य आहे. कोकाटे हे उपरे असून ते पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादीत नव्हते.तुम्ही काल आला आहात, मला बोलण्याचा तुम्हाला अधिकार काय? पक्ष आणि मी बघून घेईल,” असे म्हटले होते. यानंतर आज मंत्री कोकाटे यांनी माध्यमांशी बोलतांना पुन्हा एकदा भुजबळांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “छगन भुजबळ यांना माहिती आहे की, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे. पण कलगीतुरा नको. पक्षाकडून मला आदेश आले आहे की, भाष्य करू नये, त्यांच्याबाबतीत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. माझ्या दृष्टीने त्यांचा विषय संपला आहे”, असे कोकाटे यांनी म्हटले आहे त्यामुळे माणिक कोकाटे यांनी दिलेल्या या उत्तरावरती भुजबळ काय प्रतिक्रिया देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेले आहे.