नवी दिल्ली : पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमवरील पोस्ट करत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले, “अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. अनेक शतकांचे समर्पण, तपस्या आणि संघर्षानंतर स्थापन करण्यात आलेले हे मंदिर आपली समृद्ध संस्कृती आणि अध्यात्मिक वारसा आहे. हे दिव्य आणि भव्य राम मंदिर विकसित भारताच्या संकल्पाची प्रेरक शक्ती ठरेल असा मला विश्वास आहे.” अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक शतकांचे समर्पण, तपस्या आणि संघर्षानंतर स्थापन करण्यात आलेले हे मंदिर आपली समृद्ध संस्कृती आणि अध्यात्मिक वारसा आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.