पुणे : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विविध स्तरावर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावर बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कुठल्याही चौकशीमध्ये उद्या तुमच्यावरही आरोप होईल, तुम्ही अमूक अमूक केसमध्ये दोषी आहात. आता एसआटी, सीआयडी, न्यायाधीशांची चौकशी सुरु आहे. या संदर्भात तपास यंत्रणांवर दबाव येत आहे, असा आरोप करत मंत्री धनंजय मुंडे याचा राजीनामा मागण्यात येत आहे. सत्ताधारी आमदारांसह विरोधी पक्षातील आमदार, नेत्यांनी अशी मागणी केली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कुठल्याही चौकशीमध्ये उद्या तुमच्यावरही आरोप होईल, तुम्ही अमूक अमूक केसमध्ये दोषी आहात हे सिद्ध झाल्यावर कारवाई करण्यात येते. सध्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, जो कोणी दोषी असेल तो तिथं सिद्ध झालं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना पवार म्हणाले नेमकी बडी मुन्नी कोण हा प्रश्न तुम्ही सुरेश धस यांनाच विचारा.
त्यासंदर्भात मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, माझी कामाची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. दोषींना कडक सजा करण्यात येईल. त्यांना (सुरेश धस) मी सांगितलं आहे, नुसते आरोप करण्यापेक्षा तपास यंत्रणेला पुरावे द्या. त्याबद्दल माझी आणि बावनकुळेंशी चर्चा झालेली आहे. या प्रकरणाचा बारकाईने तपास सुरु आहे. तुम्हाला जेवढी काळजी आहे तेवढीच आम्हाला काळजी आहे. आम्ही सरकारमध्ये असल्यामुळे आमची जबाबदारी जास्त आहे. याच्यात आम्ही कुणालाही पाठिशी घालणार नाही.
अजित पवार पुढे म्हणाले की, या संदर्भात पक्ष वगैरे न बघता वरिष्ठ पातळीवर काम करणारे व्यक्ती दोषी असतील, तर कुणाचीही गय करण्याचं काम नाही. मुख्यमंत्री म्हणाले मीही त्याच मताचा आहे. प्रत्येकाची चौकशी करुन कुणाकुणाला फोन झाले, किती वेळ बोलणं झालं, हे सगळं समजणार आहे. अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात खपवून घेणार नाही. सरकारने यात गांभीर्याने लक्ष घातलेलं आहे. कुणाला काय बोलायचं याचा अधिकार संविधानाने दिला आहे. असं करताना कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल. पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, “राष्ट्रवादीमध्ये नेमकी बडी मुन्नी कोण आहे?” यावर ते म्हणाले, “हा प्रश्न तुम्ही सुरेश धस यांनाच विचारा. हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल, तर मी स्पष्ट नाव घेऊन बोलणार आहे. त्यामुळे त्यालाच विचारा कोण आहे.” असं म्हणत अजित पवार यांनी उलट सवाल केला.
दरम्यान, सुरेश धस यांनी म्हटले होते, “राष्ट्रवादीमध्ये एक मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक वरिष्ठ मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक बडी मुन्नी आहे, आणि त्या मुन्नीला म्हणा, ‘तू इथे ये.’ कुठे मिटकरी, सूरज चव्हाण या लहान पोरांना बोलायला लावते. मला माहिती आहे आणि मुन्नीलाही माहिती आहे की मी कोणाबद्दल बोलत आहे.” सुरेश धस यांच्या या विधानानंतर मोठी खळबळ निर्माण झाली. अखेर राष्ट्रवादीतील ही मुन्नी कोण? यावर चर्चा रंगताना दिसली. यावर आज अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी संताप व्यक्त केला.