नाशिक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिक्षण हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि त्यांनी ही जबाबदारी नाशिकला दिली आहे. त्यामुळे जिल्हा परीषद ,मनपाच्या शाळेत विद्यार्थी कसे टिकून राहतील यासाठी येत्या सहा महिन्यात शिक्षणाचा एक ‘रोड मॅप’ तयार केला जाईल. ज्याद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापर्वक शिक्षण मिळेल, अशी ग्वाही शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. राज्यात शिक्षण विभागात चांगले काम व्हावे यासाठी विद्यार्थी, शिक्षक यांच्या अडीअडणी समजुन घेण्यासाठी मुंबईत विविध शिक्षक संघटनांची बैठक घेण्यात आली आहे. त्या बरोबर शिक्षण संस्था चालकांची तसेच शिक्षण तज्ज्ञांची देखीलबैठक घेऊन या अडीअडचणी समजुन घेण्यात आल्या आहेत. त्यांचे मार्गदर्शन व सुचनाचे पालन करीत शिक्षणाचा एक हजार चांगला रोड मॅप तयार केला जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.
यावेळी शिवसेनेच्या वतीने चिंतामणी मंगल कार्यालय येथे मंत्री दादा भुसे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर उपनेते व जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, रमेश धोंगडे, महिला आघाडीच्या सुवर्णा मटाले, दिगंबर मोगरे आदी उपस्थित होते. आगामी पंचायत समिती, महानगरपालिका, जिल्हा परीषद निवडणुकीत आपल्याकडे जे येतील त्याचे स्वागत करा. पक्ष वाढविणे गरजेचे आहे असे सांगताना जे जुने आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, फक्त किंतू परंतू मनात न ठेवता पक्ष वाढीसाठी काम करा ज्यांनी पक्षासाठी जीवाचे रान केले.
यावेळी बोलतांना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी कार्यक्रमाला येताना बुके नको बुक आणा असे आवाहन भुसे यांनी केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बुके न आणता पुस्तके वह्या आणल्या होत्या. यावेळी भुसे यांची पुस्तक तुला करण्यात येऊन ही पुस्तके व वह्या आदिवासी भागातील शाळेत वाटण्यात येणार आहेत. त्यांच्यासाठीचा हा पुढचा काळ आहे असेही ते म्हणाले. लाडकी बहीण योजनेबाबत अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. ही योजना आधी होती तशीच आहे. यात काहीही बदल करण्यात आलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.