१० कोटी अंश तापमान ४८ सेकंदांपर्यंत राखण्याचा जागतिक विक्रम

0

सियोल – दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या कृत्रिम सूर्याने १०० दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान ४८ सेकंदांपर्यंत राखण्याचा जागतिक विक्रम केला आहे. हे तापमान सूर्याच्या गाभ्याच्या तापमानापेक्षा सातपट जास्त आहे. २०२१ मध्ये ३० सेकंदांचा विक्रम झाला होता. शास्त्रज्ञांनी कोरिया सुपरकंडक्टिंग टोकामॅक ॲडव्हान्स्ड रिसर्च उपकरण तयार केले.यात हे तापमान न्यूक्लीयर फ्युजन प्रयोगांदरम्यान तयार करण्यात आले.

हा प्रयोग २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या काळात करण्यात आला.न्यूक्लिअर फ्युजनमध्ये दोन हलकी अणू केंद्रके एकत्र होऊन जड अणू बनतात. यामध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण. सूर्यासारख्या तार्‍यांनाही न्यूक्लिअर फ्युजनमधून ऊर्जा आणि प्रकाश मिळतो. यामध्ये हायड्रोजनचे अणू एकत्र येऊन हेलियम तयार करतात.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech