उत्खननात आढळले ५०० वर्षे प्राचिन शिव मंदिर

0

पाटणा : बिहारच्या पाटणा शहरात उत्खननात सुमारे ५०० वर्षे प्राचिन मंदिर सापडले. शहरातील सुलतानगंज पोलिस स्‍टेशनच्या हद्दीत मठ लक्ष्मणपूर परिसरात हे मंदिर सापडले आहे. या ठिकाणी जमिन खचल्‍यानंतर जमीन खोदण्यात आली तेंव्हा उत्‍खनन करण्यात आले त्यावेळी हे प्राचिन शिव मंडम मंदिर सापडले. पाटनातील मठ लक्ष्मणपूरमध्ये शिव मंदिर मिळाल्‍याची माहिती या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या माहितीनंतर या ठिकाणी परिसरातील तसेच आसपासच्या भागातील नागरिकांनी गर्दी केली. यावेळी येथे जमलेल्‍या लोकांनी भगवान शंकराच्या नावाचा जयघोष करत पूजा आरती सुरू केली. या ठिकाणी बऱ्याच वर्षापूर्वी एक मठ होता. एका कौटुंबिक वादानंतर हा परिसर कचरा फेकण्यात आल्‍याने तसाच पडून होता. मात्र, ५ जानेवारी रोजी जमीन खचल्‍याने या परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले.

स्‍थानिक लोकांच्या मते हा मंडप ५०० वर्षे जुना असल्‍याचे दिसून येत आहे. स्‍थानिकांच्या म्‍हणण्यानुसार, या प्लॉटवर काही लोकांनी बेकायदेशीरपणे कब्‍जा केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर जेंव्हा या ठिकाणी स्‍वच्छता करण्यात आली, तेंव्हा खोदकामात या ठिकाणी जमिनीतून काळ्या पाषाणात साकारलेलं भव्य शिव मंडप मंदिर समोर आलं. स्‍थानिकांच्या माहितीनुसार, या ठिकाणी अजुनही खोदकाम करण्यात येणार आहे. या ठिकाणी खोदकाम सुरू करण्यात आले. तेंव्हा या ठिकाणी आश्चर्यकारक पद्धतीने एक भव्य आणि कलात्‍मक शिव मंदिर आढळले. आजुबाजुच्या परिसरातून मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी शिव मंडप मंदिर पहायला गर्दी करू लागले. या ठिकाणी लोकांनी शिव मंडप मधील शिवलिंगाची स्‍वच्छता करून पूजा, आरती सुरू केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech