पुढील 15 दिवस राज्यात उष्णतेची लाट

0

दुपारी 12 ते 3 घराबाहेर पडू नका; पुणे वेधशाळेचं आवाहन

पुणे : पुण्यासह राज्यात अनेक शहरातील (Weather Update) तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. किमान तापमानात देखील वाढ झाली आणि महत्वाचं म्हणजे रात्रीच्या तापमानातदेखील चांगलीच वाढ झाली आहे. त्यात पुढील 15 दिवस उष्णतेची लाट पुण्यासह (Heat Wave) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे. पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

गेल्या दोन दिवसात विदर्भामध्ये 42 अंश सेल्सिअस, 43 अंश सेल्सिअस पर्यंत गेले मराठवाड्यामध्ये पण काही ठिकाणी 40अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुणे, नाशिक, जळगाव या ठिकाणी पण आपल्या चाळीसच्यावर आकडे जाताना दिसतात तर सर्वसाधारणपणे गेल्या काही एक दिवसापासून हिट वेव्हची सुरुवात झालेली आहे येणाऱ्या दिवसांमध्ये सर्वसाधारणतः आपल्याला अशाच प्रकारे तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचं होसाळीकर म्हणाले.

12 ते दुपार 3 पर्यंत घराबाहेर पडू नका!
येणारा काळ हा निवडणुकीचा असल्यामुळे अनेक जणं ज्यामध्ये मतदार, पक्षाचे अनेक लोकं कार्यक्रमात असतील त्यांनी देखील काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सकाळी 12 ते दुपार 3 पर्यंत अतिमहत्त्वाचे नसेल असेल तर बाहेर पडू नका, असा सल्ला पुणे वेध शाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech