ठाणे : भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक माजी फलंदाज विनोद कांबळी यांना प्रकृतीच्या कारणास्तव ठाणे ( भिवंडी ) येथील आकृती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी भेट घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली तसेच आकृती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करून विनोद कांबळी यांच्या उपचारात कोणतीही गोष्ट कमी राहणार नाही याची काळजी घ्या अशी विनंती केली. क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची सध्याची परिस्थिती पाहता कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कांबळी यांस वैयक्तिक ५ लक्ष रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले आहे.
राज्याचे संवेदनशील माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीबद्दल क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच हॉस्पिटलमध्ये भेटण्याची विनंती केली. लवकरच उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि संवेदनशील खा डॉ. श्रीकांत शिंदे हे क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची भेट घेऊन कांबळी परिवाराला मदत करणार आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून ही मदत पूढील आठवड्यात करण्यात येणार असून येणाऱ्या काळात त्यांना अजून मदत करण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिल्याचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी सांगितले.