पाकिस्तानी क्षेपणास्त्रांचा जगाला धसका; लांब पल्ल्याच्या शस्त्रामुळे आण्विक युद्धाचा धोका

0

इस्लामाबाद : अमेरिकेने पाकिस्तानच्या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमतेचे सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे वर्णन केले आहे आणि ते प्रादेशिक आणि जागतिक स्थिरतेसाठी आव्हान असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. अलीकडेच पाकिस्तानच्या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर अमेरिकेने टीका केली होती. अमेरिकेच्या आरोपानंतर पाकिस्तानने म्हटले की, हे सर्व बेताल आरोप आहेत. शेजारी देशाने म्हटले की, मोठ्या गैर-नाटो देशावर असे आरोप दोघांमधील संबंध बिघडू शकतात. आम्ही कधीही अमेरिकेबद्दल वाईट इच्छा बाळगली नाही आणि संबंध टिकवून ठेवण्यासाठी अनेक त्यागही केले. तसेच अमेरिकन धोरणाचा फटका बसला आहे असेही पाकिस्तानने म्हटले आहे. आता अमेरिकेच्या वक्तव्यावर पाकिस्तानचे प्रत्युत्तर आले आहे. पाकिस्तानने अमेरिकेच्या दाव्यांवर आक्षेप घेत ते नाकारले आणि त्यांना तर्कहीन म्हटले आहे. पाकिस्तानने असे क्षेपणास्त्र बनवले आहे, जे अमेरिकेलाही मारा करू शकते, असे अमेरिकेने म्हटले होते.

मुमताज जहरा बलोच म्हणाल्या की, अमेरिकन अधिका-याने पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र क्षमता आणि वितरण साधनांना दिलेला कथित धोका दुर्दैवी आहे. हे आरोप बिनबुडाचे, तर्कहीन आणि इतिहासाचे आकलन नसलेले आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन फाइनर यांनी सांगितले की, पाकिस्तान अमेरिकेसह दक्षिण आशियापासून दूरपर्यंत मारा करू शकणारी लांब पल्ल्याची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. या क्षेपणास्त्राची रेंज अमेरिकेपर्यंत असू शकते, असे ते म्हणाले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज जहरा बलोच यांनी सांगितले की, त्यांचा देश क्षेपणास्त्र क्षमता विकसित करत राहील. यासोबतच पाकिस्तानच्या मनात भारताची भीतीही दिसत होती. भारताकडून निर्माण होणारे धोके लक्षात घेता हे क्षेपणास्त्र कार्यक्रम अत्यंत आवश्यक असल्याचे बलोच यांनी यावेळी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech