नवी दिल्ली : संसद भवन परिसरात गुरुवारी झालेल्या धक्काबुक्की प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. संसदेत आणि संसद बाहेर निदर्शन करणाऱ्या खासदार विरोधात लोकसभा अध्यक्ष कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता आहे. अध्यक्षांच्या खुर्ची जवळ गेलेल्या आणि संसदेच्या मकर द्वार गेटजवळ धक्काबुक्की करणा-या खासदारांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते.
त्याचप्रमाणे संसदेत आणि संसद बाहेर निदर्शन करणाऱ्या खासदार विरोधात लोकसभा अध्यक्ष कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता आहे. अध्यक्षांच्या खुर्ची जवळ गेलेल्या आणि संसदेच्या मकर द्वार गेटजवळ धक्काबुक्की करणा-या खासदारांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते. दरम्यान लोकसभा अध्यक्षांनी संसदेत आणि प्रवेशद्वारावर कोणतंही निदर्शने करण्यासाठी मनाई केलीय. शिवाय कोणताही खासदाराला अडवणूक करता येणार नसल्याचा आदेशही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला आहे.
याप्रकरणी काँग्रेस आणि भाजप दोन्हीनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी राहुल यांच्यावर धमकी देणे, जाणीवपूर्वक दुखापत पोहोचवणे यांसह इतर कलमे लावण्यात आली आहेत. पोलिसांनी राहुल गांधी यांच्यावर कलम ११७ जाणून बुजून दुखापत पोहोचवणे, कलम ११५ दुखापत करण्याच्या उद्देशाने कृत्य करणे, कलम ३ (५) सामूहिक पणे गुन्हा करणे, कलम १२५ खाजगी सुरक्षेला जोखीम मध्ये टाकणे, कलम १३१ धक्का देणे आणि भिती घालणे, कलम ३५१ धमकी देणे याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.