नवी दिल्ली : खासदार शरद पवार यांनी आज, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या समवेत पवार यांनी दोन्ही नेत्यांना डाळिंबाच्या प्रश्नावर चर्चा केली. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि डाळिंब लागवडीतील आव्हाने यावर यावेळी चर्चा करण्यात आली. विशेषत: डाळिंब उत्पादकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यावर भर द्यावा. आमच्यातील चर्चा केवळ शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर केंद्रित होती, असेही पवारांनी सांगितले. या भेटीनंतर राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि डाळिंबाच्या प्रश्नावर ही भेट झाली. पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या संवादात कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही, असे पवार यांनी भेटीनंतर सांगितले.