धावत्या स्कूल बसला आग, शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली

0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील घटना समोर आली आहे. घाटनांद्रा येथून शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस निघाली होती. ही बस आमठाणा येथे असताना त्यातून धूर निघू लागला. बस चालकाला ही बाब लक्षात आली. त्याने लागलीच वाहन थांबवले. यावेळी बसमध्ये दोन शिक्षक बसले होते. त्यांनी प्रसंगावधान राखत सर्व मुलांना तातडीने खाली उतरवले. सर्व मुले बसमधून खाली उतरवल्यावर काही क्षणात बसने पेट घेतला. आज सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका स्कूल बसला आग लागली आहे.जेव्हा ही आग लागली तेव्हा या बसमध्ये ३५ मुले होती. दोन शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे या चिमुकल्यांचे जीव वाचला. ही घटना आज बुधवारी सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावाजवळ घडली आहे.

दरम्यान, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला आग लागल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.या घटनेची माहिती मिळताच त्या भागातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील विहिरीचे पाणी पाईपलाईनला जोडले. त्यानंतर बसवर पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. बसमध्ये चौथी ते सातवी वर्गात शिकणारे विद्यार्थी होते. जवळपास परिसरातील तब्बल ५०० मुले खाजगी वाहनाने शाळेत ये-जा करतात.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech