गुलाबी स्वप्नं दाखवणाऱ्या पोकळ घोषणा

0

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची सरकारवर टीका
नागपूर – सत्तेत येण्यासाठी सरकारने मोठी

मुंबई :  गुलाबी स्वप्नं दाखवली मात्र प्रत्यक्षात सत्तेत आल्यावर सरकारने केलेल्या घोषणा या पोकळ निघाल्या अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास, माता भगिनींच संरक्षण करण्यास कमी पडले आहे. यूपीएससी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवल्यामुळे बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यास असक्षम ठरले असून राज्यपालांनी त्यांच्या भाषणात गोडगोड गुलाबी घोषणा केल्या असल्याचे म्हणत दानवे यांनी राज्यपालांच्या भाषणाबाबत खेद व्यक्त केला आहे. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा सात महिन्यात उभारलेल्या पुतळ्याचे सात महिनेही संरक्षण सरकारला करता आलं नाही, अशी टीका दानवे यांनी केली.

महायुतीने प्रकाशित केलेल्या जाहीरातींमध्ये राजश्री शाहू महाराजांचा फोटोचा विसर सरकारला पडला. सरकारच्या काळात महिला मुलींवर अन्याय अत्याचार होत असताना शिवरायांच्या कोणत्या विचारांचा पालन सरकार करते असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. राजश्री शाहू महाराजांनी महाराष्ट्र राज्याला समतेच राज्य दिल मात्र यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे राज्यपाल यांच भाषण हे कागदावरच व सरकारच कौतुक करणार असून याबाबत दानवे यांनी ते खेदजनक असल्याचे म्हटले.

1 जुलै 2022 ते 30 नोव्हेंबर 2024 या महायुती सरकारच्या कार्यकाळात 6740 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वात जास्त आत्महत्या या नागपूर, अमरावती विभागात झाल्या आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री यांनी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र केलेली घोषणा हवेतच विरली. आत्महत्यामुक्त घोषणा केली होती मात्र शेतमालाल हमीभाव मिळत नाही, जे त्यांना हा भाव देत नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला जात नाही असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केला. कांद्याचे आयात निर्यात धोरण, दुधाचे घसरलेले भाव यावर देखील दानवे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. राज्यावर 8 लाख कोटींच कर्ज असताना राज्याची अर्थव्यवस्था 2028 पर्यंत 417 वरून 1 हजार ट्रीलियन अमेरिकन डॉलर करण्याचे सरकारचे उद्दिष्ट म्हणजे दिवास्वप्नं असल्याचा टोला दानवे यांनी सरकारला लगावला.

महाराष्ट्र राज्य आज दरडोई उत्पन्नावर 1 नंबर वर असला तरी तामिळनाडू, गुजरात राज्याप्रमाणे जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे. राज्याची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. मागील काळात राज्याला आर्थिक अधोगतीला नेण्याच पाप या सरकारने केल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील मुलांना अजून पगार मिळाला नाही. या योजनेत बीएससी कृषी पदवी व कृषी डिप्लोमा असलेल्यांचा समावेश करण्याची मागणी दानवे यांनी केली.

मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेतून 3 सिलेंडर देण्याची घोषणा सरकारने केली. मात्र उज्वला योजनेतूनही 3 सिलेंडर देण्याची मागणी दानवे यांनी केली. नंदुरबार आणि पालघर आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना अद्याप मूलभूत सुविधा नाहीत. आदिवासी शाळा व आश्रमशाळांकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे. विविध कारणांमुळे 680 विद्यार्थ्यांचे मृत्यू हे आश्रमशाळा व वसतिगृहात झाले असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात दिली. ऑलम्पिक स्पर्धेत नेमबाजीत कांस्यपदक विजेता ठरलेल्या स्वप्नील कुसळे याला सरकारने 2 कोटी रुपयांवर बक्षिसाची बोळवण केली हे पाहता खेळाचं मान सरकारने ठेवण आवश्यक असल्याचे दानवे म्हणाले.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप आणि कुसुम योजनेत तफावत आहे. 12 लाख 26 शेतकरी यांनी सौर कृषी पंपसाठी अर्ज केलेला असताना 1 लाख अर्जदारांना फक्त कृषी पंप वितरित झाले. त्यामुळे तालुकास्तरावर सौर कृषी पंप वितरणासाठी स्वतंत्र आस्थापना करण्याची सूचना देखील दानवे यांनी सरकारला केली. 2023 सालाचे खरीप रब्बी पिकाचे अद्याप 195 कोटी रुपये निधीचे वाटप बाकी असून पीक विमा कंपन्यांच्या भोंगळ कारभाराबाबत दानवे यांनी सरकारचे लक्ष वेधले. नांदूर – मधमेश्वर प्रकल्पासाठी पुरवण्या मागण्यांमध्ये ६० कोटी रुपये निधी देण्यात आला असल्याची माहिती आहे. मुक्तेश्वर प्रकल्पासही अशीच मंजुरी मिळावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech