नागपूर : राज्यात गोहत्या आणि गोवंश हत्या बंदी कायद्यानुसार कार्यवाही व्हावी, अशी मागणी शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी विधानसभेत केली. महाराष्ट्रात गोहत्या आणि गोवंश हत्या बंदी कायदा आहे; परंतु रत्नागिरीमध्ये उघडपणे गोहत्या चालू आहेत. गोहत्या रोखावी, तरी अनेक आंदोलने केली तरी तेथील गोहत्या थांबलेल्या नाहीत. वर विरोधात आंदोलने केली म्हणून आमच्यावर खटले नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे गोहत्या करणार्यांवर कडक कारवाई व्हायला हवी. राज्यात हिंदुत्वनिष्ठ सरकार बहुमतात आहे. अशा वेळी गोहत्या थांबवता आल्या नाही, तर कधी थांबणार ? असा प्रश्न उपस्थित करत राज्यात गोहत्या आणि गोवंश हत्या बंदी कायद्यानुसार कार्यवाही व्हावी, अशी मागणी शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी विधानसभेत केली. विधानसभेत राज्यपालांच्या भाषणावरील अभिनंदनाच्या प्रस्तावावरील भाषणाच्या वेळेत त्यांनी वरील सूत्रे उपस्थित केली.