नवी दिल्ली : अग्निवीर योजनेमुळे सैन्यभरतीसाठी तयारी करणाऱ्यांचे अंगठे कापले. अदानी, अंबानी यांना मदत करून शेतकऱ्यांचे अंगठे कापले जात असल्याचे आरोप त्यांनी सरकारवर केले. त्यामुळे आमचे पुढचे पाऊलं जातनिहाय जनगणना असेल. तसेच 50 टक्के आरक्षणाची भिंत आम्ही पाडणार असल्याची घोषणा राहुल यांनी लोकसभेत केली. ज्या पद्धतीने द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा कापला होता. तसेच सरकार प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे अंगठे कापत असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.
गुरू द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा कापला होता, तसाच देशाचा अंगठा कापला जात आहे. देशातील तरूण, मागसवर्गींयांचे, मजूरांचे अंगठे कापले जात आहेत. देशातील सर्व क्षेत्र अदानींच्या घशात घातले जात आहेत. लोकसभेत भारतीय राज्यघटनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आज, शनिवारी झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधींनी सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक समानता संपुष्टात आणली जात आहे. सरकारकडून इमानदारीने काम करणाऱ्या सर्वांचे अंगठे कापले जात आहेत. राज्यघटनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडीत नेहरूंचे विचार ध्वनीत होतात. हे विचार भारताच्या समृद्ध संस्कृतीचे प्रतिक आहेत. मात्र भाजपवाले चोवीस तास संविधानावर हल्ला करतात, असा आरोप राहुल यांनी केला.