नवी दिल्ली : दिल्लीच्या दिशेने कूच करणाऱ्या शेतकऱ्यांना आज, शनिवारी हरियाणा आणि पंजाब सिमेवरील शंभू सीमेवर थोबवण्यात आले. तसेच शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने अंबालामधील काही भागात इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याठिकाणाहून १०१ शेतकऱ्यांचा गट दिल्लीकडे कूच करेल असे जाहीर करण्यात आले होते. परंतु, पोलिसांनी त्यांना मज्जाव करत परत पाठवले. शंभू सीमेवरून दिल्लीकडे शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा पुन्हा सुरू होण्याच्या काही तास आधी, हरियाणा सरकारने शनिवारी ‘सार्वजनिक शांतता’ राखण्यासाठी अंबाला जिल्ह्यातील १२ गावांमध्ये मोबाइल इंटरनेट आणि मोठ्या प्रमाणात मोबाईल-एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुमिता मिश्रा यांनी जारी केलेल्या आदेशानुसार हे निलंबन १७ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे. आजपासून १७ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट बंद राहणार आहे.
सार्वजनिक सुव्यवस्थेत कोणत्याही प्रकारचा गडबड होऊ नये म्हणून शांतता आणि सुसंवाद जारी केला आहे. हे निलंबन 14 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते 17 डिसेंबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत लागू असेल. तर दुसरीकडे कुस्तीपटू बजरंग पुनियाने शेतकऱ्यांना समर्थ जाहीर केले आहे. शंभू बॉर्डरला रवाना होण्यापूर्वी बजरंग पुनिया यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विषयावर बोलताना ‘देशात वन नेशन, वन इलेक्शन’ची चर्चा होऊ शकते, तर वन नेशन, वन एमएसपीचीही अंमलबजावणी व्हायला हवी अशी मागणी बजरंगने केलीय.
आदेशामध्ये म्हटले आहे की, ‘अतिरिक्त पोलिस महासंचालक, सीआयडी, हरियाणा आणि उपायुक्त, अंबाला यांनी माझ्या निदर्शनास आणून दिले आहे की, काही शेतकरी संघटनांनी दिल्ली मार्चचे आवाहन केल्यामुळे तणाव, आंदोलन, सार्वजनिक अंबाला जिल्ह्याच्या परिसरात अशांतता आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, अंबाला येथील डांगडेहरी, लेहगढ, मानकपूर, दादियाना, बारी घेल, छोटी घेल, लहरसा, कालू माजरा, देवी नगर (हीरा नगर, नरेश विहार), सदोपूर, सुलतानपूर आणि काकरू या गावांमध्ये मोबाईल इंटरनेट बंद करण्याचे आदेश ही बाब आहे.