प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटीचे अंतिम ध्येय…….! -भरत गोगावले यांची ग्वाही

0

अनंत नलावडे

मुंबई : मुंबईत कुर्ला येथे जी भीषण बस दुर्घटना घडली एस टी महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेना नेते आ.भरत गोगावले यांनी बुधवारी तातडीने सर्व प्रशासकीय प्रमुख,व अन्य अधिकाऱ्यांची खास बैठक बोलावून अशा घटना एसटी मध्ये घडू नयेत या दृष्टीने त्यांनी सर्व प्रमुखांना आवश्यक त्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचना दिल्या. तयानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटीचे अंतिम ध्येय राहील अशी स्पष्ट ग्वाहीही दिली.

गोगावले म्हणाले की,दररोज ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उददेशाने एसटी महामंडळ गेली ७६ वर्ष काम करीत असून रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी चालकांचे सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचे मानसिक आरोग्य सुदढ करणे या बरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष बसेंस उपलब्ध करुन देणे या त्रिसुत्रीवर यापुढे भर देण्यात येणार आहे.

प्रवाशांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करुन देण्याच्या उददेशाने चालक प्रशिक्षण,चालकांची निवड चाचणी, चालकाचे मानसिक आरोग्य याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष वाहन उपलब्ध करुन देण्याबद्दलही आजच्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. सध्या एसटी महामंडळाच्या चालकांना अपघात होऊ नये यासाठी दर ६ महिन्याला उजळणी प्रशिक्षण दिले जाते.या प्रशिक्षणामध्ये चालकांच्या मानसि क आरोग्या बरोबरच त्यांचे बस चालवण्याचे कौश्‍ल्य विकसित करण्यावर भर दिला जातो. त्यानंतर प्रत्यक्ष वाहन चालन चाचणी घेऊन त्यांना पुनश्च सेवेमध्ये दाखल केले जाते. तसेच कर्तव्यावर असताना संबंधित चालकाने नशापान न करणे याचे काटेकोर पालन केले पाहिजे.हित पध्दत एसटीकडे कार्यरत असलेल्या खाजगी चालकांना देखील वापरण्याच्या सुचना एसटी प्रशासनाला देण्यात आल्याचे गोगवले यांनी स्पष्ट केले.

वेळेत बसेसचा पुरवठा न करण्या-या संस्थाना कारणे दाखवा नोटिसी पाठवा…….

सध्या एसटी महामंडळाकडे १४००० बसेस असून,उपलब्ध प्रवाशांसासाठी त्या अत्यंत अपु-या पडत आहेत. त्यापैकी अनेक बसेस अंत्यत जुन्या झाल्या आहेत.तसेच काही बसेस कालबाहय होण्याच्या उंबरठयावर आहेत.हि वसुस्थिती लक्षात घेता निविदा पात्र संस्थानी नवीन बसेस वेळेत पुरवठा करणे अत्यंत आवश्यक होते. मात्र त्या संस्था बसेस पुरविण्या बद्दल सक्षम का नाहीत? याची शहानिशा करुन त्यांना कारणे दाखवा नोटिस पाठवुन द्या असेही सक्त निर्देश एसटी प्रशासनाला दिल्याची माहितीही गोगावले यांनी दिली.

भाडेवाढीचा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर करणार.,..

कर्मचाऱ्याचे वाढते वेतन, इंधनाचा वाढता दर, टायर आणि सुटटया भागांची वाढती किंमत विचारात घेऊन २०२१ पासुन प्रंलबित असलेली एसटीची ‍तिकीट भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर केला जाईल अशीही माहिती अध्यक्ष गोगावले यांनी दिली.या वेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर व एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech