मुंबई : देशातील उत्तरेकडून वाहणाऱ्या शीतलहरींनी देश व्यापण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात प्रामुख्यानं उत्तरेकडील क्षेत्रामध्ये किमान तापमान ८ अंश सेल्सिअसवर पोहोचल्यामुळं इथं गारठा कमालीचा वाढल्याचं लक्षात येत आहे. तर, धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये शीतलहरीचा प्रकोप कायम आहे. धुळ्यात मंगळवारी रात्रीच्या वेळेस शहरात ५.८°c तापमानाची नोंद झालेली आहे. फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर झालेला परिणाम आता पूर्णपणे विरला असून, देशभरामध्ये थंडीचा जोर वाढताना दिसत आहे.महाराष्ट्रात प्रामुख्यानं उत्तरेकडील क्षेत्रामध्ये गारठा कमालीचा वाढला आहे. तर काल हे तापमान ४ अंश इतक्या निच्चांकी पातळीवर आल्यानं तिथं हिमाचल प्रदेशातील शिमल्यामध्ये दिवसा जाणवणारं तापमान एकसारखं असल्याचं आढळून आलं आहे.देशातील उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढत असून, पश्चिमी झंझावातामुळं ही थंडी आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवत १८ डिसेंबरपर्यंत हे चित्र बदलणार नसल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. परिणामी पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान ९ अंशांच्या खाली येण्याचा अंदाज असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
थंडगार बोचऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा प्रकोप अधिकच जाणवत आहे. अशा थंडीमध्ये शरीराची काळजी घेणारे नागरिक घराबाहेर पडून व्यायामाला प्राधान्य देत आहेत, तर अनेक नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. येणारे काही दिवस शीतलहरीचा प्रकोप असाच कायम राहील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी आणि लहान बाळांची काळजी घ्यावी असा अहवाल तज्ज्ञांनी केल आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये वाढलेल्या थंडीच्या कडाक्यासमवेत महाराष्ट्राच्या थंडीवर थेट पाकिस्तानहून वाहत येणाऱ्या वाऱ्यांचाही परिणाम होत आहे. पाकिस्तानातून जमिनीलगत वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळं राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढताना दिसत आहे.दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात असणारा हा थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मुंबईत निच्चांकी तापमानाची नोंद झाल्यानंतर आता किमान तापमानात पुन्हा एकदा वाढ होत असून, हा आकडा पुढील तीन ते चार दिवस वाढलेलाय असून, साधारण १८ ते २० अंशांदरम्यान हा आडका राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होत असल्यामुळं या कारणास्तव मुंबईत तापमानवाढ होताना दिसत आहे.