७५ भारतीय नागरिकांना सीरियातून सुरक्षित बाहेर काढले

0

दमास्कस : सीरियातील बशर अल असाद यांचे सरकार हयात तहरीर अल शाम संघटनेने उलथवून लावल्याने गोंधळ माजला आहे. यामध्ये भारताने सीरियातून ७५ भारतीय नागरिकांना बाहेर काढले. भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दलचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांना देशातून बाहेर काढण्याचे काम दमास्कस आणि बैरूतमधील भारतीय उच्चायुक्तालयातून करण्यात आले. तसेच सरकार परदेशात भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देते. परराष्ट्र मंत्रालयाने सीरियात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना दमास्कसमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे. सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवणार आहे. असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. सीरियातील सत्तेवर बंडखोरांनी ताबा मिळवला आहे. अनेक ठिकाणी हिंसक हल्ले होत आहेत. सरकारी इमारती जाळल्या जात आहेत. लूटमार केली जात आहे. अचानक झालेल्या या उलथापालथीमुळे अनेक परदेशी नागरिक सीरियात अडकले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा परिस्थितीची आढावा घेतल्यानंतर या ऑपरेशनचे समन्वय दमास्कस आणि बेरूतमधील भारतीय दूतावासांनी केले. भारताने मंगळवारी (१० डिसेंबर) सीरियात अडकलेल्या ७५ नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.सीरियातून बाहेर काढण्यात आलेल्या भारतीयामध्ये जम्मू-काश्मीरमधील ४४ यात्रेकरूंचा समावेश आहे.हे सैय्यदा जैनब (सीरियातील शिया मुस्लिमांचे एक धार्मिक स्थळ) येथे अडकले होते. सर्व भारतीय नागरिकांना सीरियातून बाहेर काढल्यानंतर सुरक्षितपणे लेबनॉनला पोहोचले आहेत. त्यानंतर विमानातून त्यांना भारतात आणलं जाणार आहे.हयात तहरीर अल शामच्या बंडखोरांनी बशर अल असाद यांच्या सरकार हटवल्याच्या दोन दिवसांनी ही गोष्ट घडली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech